‘परफेक्ट’ प्रयत्नांमध्ये सातत्य हवे… (प्रभात open house)

‘कोई भी देश परफेक्ट नाही होता, उसे परफेक्ट बनाना पडता  है’ रंग दे बसंती चित्रपटातील माधवनचा डायलॉग एका वाक्यात बराच काही सांगून जातो. आपल्या भारत देशाला गरिबी, उपासमारी, भ्रष्टाचार अश्या असंख्य समस्यांसोबत झुंजावे लागत आहे आणि त्याच वेळी ‘काही नाही होऊ शकत या देशाचे!’ ‘इथे काही बदल होणे अशक्य आहे’ अशी नैराश्य वाणी देखील सहज कानी पडून जातेय. आपण अमेरिका, युरोप, जपान यांच्या तुलनेत किती मागासलेले आहोत हेच रडगाणे गात फिरण्यात धन्यता मानतोय. काही दिवस परदेशात राहिलेली माणसे भारतात आल्यावर ‘ओह माय गॉड, किती गर्दी आहे इथे! किती ती गर्मी, हाऊ कॅन व्ही सर्वाइव हिअर’ अश्या प्रकारच्या गमजा मारताना दिसून येतात. खरंच यांची कीव येते. अहो प्रतिकूलता हे काही पलायनाचे कारण होऊ शकत नाही ना.

जपान मध्ये आजही कित्येत भूकंप होतात, तरी ते लोक तितक्याच खंबीरतेने आपल्या देशाला पुन्हा उभे करतातच ना. युरोप मध्ये थंडी इतकी असते कि बाहेर पडणे मुश्किल होऊन जाते, पण तेथील लोकांनी हातावर हात ठेवून न बसता आपल्या देशांना प्रगतीच्या शिखरावर नेवून पोहोचवले आहे. त्या शिखराच्या बाजूला अजून एक ‘भारत प्रगती शिखर’ बनवण्या पासून आपल्याला कुणी रोखलंय का?

आपल्याही देशाने स्वातंत्र्यानंतर बरीच प्रगती केलीय आणि अजूनही करत आहे. स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ISRO च्या माध्यमातून गगन भरारी मारत आहेत. सामाजिक, क्रीडा, विज्ञान अश्या अनेक क्षेत्रांमध्ये भारत दिवसागणिक एक एक शिखर पादाक्रांत करत आहे. पण खरंच एवढं पुरेसे आहे का? अजूनही आपल्या देशातील सामान्य नागरिकांच्या मानसिकते मध्ये “Can Do Attitude’ दिसून येतो का? इथेच आपल्याला प्रगती करायची आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ सारखे मौलिक कार्य दोन्ही हातानी पुढे न्यायचे आहे. भारत देश ‘परफेक्ट’ होण्यासाठी म्ह्णून जे काही प्रयत्न आपण करतोय त्यामध्ये सातत्य हवे. आपले जे काही कौशल्य असेल ते भारताच्या प्रगतीसाठी कसे कामी लावता येईल याचा विचार करावयास हवा. अखेरीस भगवान रामानं देखील खारीच्या त्या छोट्याश्या वाट्याला आपलासा मानून घेतलेलं, मग आपण आपल्या देशाला संपूर्ण आणि समृद्ध बनवण्यासाठी तो खारीचा वाटा तरी उचलायलाच हवा!!!
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वाना शुभेच्छा !!!

 – योगेश सोहनी, मुंबई 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)