#IND_vs_AUS Test XI Practice Match : ऑस्ट्रेलिया एलेव्हनचे जोरदार प्रत्युत्तर

सिडनी – ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 4 दिवसीय सराव सामन्यात भारताच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया एलेव्हन संघाने तिसरा दिवस अखेर 6 बाद 356 धावा करताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बलाढ्य समजले जाणारे भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.

सराव सामन्याचा पहिला दिवस पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने फलंदाजी करताना दिवस अखेर सर्वबाद 358 धावांपर्यंत माजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळाताना ऑस्ट्रेलिया एलेव्हन संघाने दुसऱ्या दिवशी चार षटकांत बिनबाद 24 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी खेळताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने सावध सुरूवात केली. यावेळी डार्सी शॉर्ट आणि मॅक्‍स बार्यंटने चांगली सलामी करुन देत भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत चांगले फटके मारले.

यावेळी मॅक्‍स बार्यंटने चेंडू मागे धाव या धावगतीने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला शंभरी गाठून दिल्यानंतर 65 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. यावेळी बार्यंट आणि शॉर्टयांनी 18.3 षटकांत 114 धावांची धडाकेबाज सलामी दिली. तर, यानंतर शॉर्टने फटकेबाजी करत संघाला दिड शतकी टप्पागाठुन दिल्यानंतर 74 धावांवर असताना तो बाद झाला.

यानंतर जेक कार्डर आणि कर्णधार सॅम व्हाईटमनयांनी अनुक्रमे 38 आणि 35 धावांची खेळी करत संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करुन दिला. यानंतर 3 बाद 213 नंतर ऑस्ट्रेलिया एलेव्हन संघाची 6 बाद 234 अशी छोटीशी घसरगुंडी उडाली. यानंतर हॅरी निल्सन आणि ऍरोन हार्डीयांनी डावाची सर्व सुत्रे आपल्या हाती घेत सावध पवित्रा आजमावत फलंदाजी करायला सुरूवात करत संघाचा डाव सावरला.

यावेळी दोघांनीही मोठे फटके मारण्याचा मोह टाळत संघाला तिनशे आणि साडे तिनशे धावांचा टप्पा ओलांडोन दिला. यावेळी तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा हॅरी निल्सनहा नाबाद 56 धावांवर खेळत होता. तर, ऍरोन हार्डी 69 धावांवर खेळत होता. यावेळी भारताकडून मोहोम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी मिळवले तर, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्‍विन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक –

भारत पहिला डाव 92 षटकांत सर्वबाद 358 (पृथ्वी शॉ 66, विराट कोहली 64, चेतेश्‍वर पूजारा 54, अजिंक्‍य रहाणे निवृत्त 56, हनुमा विहारी 53, ऍरोन हार्डी 4-50). ऑस्ट्रेलिया एलेवन पहिला डाव 102 षटकांत 6 बाद 356 (डार्सी शॉर्ट 74, ऍरोन हार्डी नाबाद 69, मॅक्‍स बार्यन्ट 62, हॅरी निल्सन नाबाद 56, मोहोम्मद शमी 67-3, उमेश यादव 81-1, रविचंद्रन अश्‍विन 63-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)