Ind vs WI T-20: भारतीय संघाला विजयी आघाडी मिळवण्याची संधी

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 क्रिकेट मालिका

लखनऊ: कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील विजयी परंपरा कायम राखताना भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्या टी-20 सामन्यात रडत पडत का होइना पण विजय आपल्या नावे केल्यानंतर आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्यास भारतीय संघ उत्सूक असून आजचा सामना जिंकून विंडीज मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2014 नंतर विंडीज विरुद्ध पहिला टी-20 विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आपली विजयाची हिच परंपरा कायम राखण्यास आज होणाऱ्या सामन्यात उत्सूक असणार आहे. तर, केवळ 110 धावांचे लक्ष्यासमोर भारतीय संघाला परेशान करणाऱ्या विंडीजला आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याची संधी असणार आहे.
रविवारच्या सामन्यात भारतीय संघाने विंडीजचा पाच गडी राखून पराभव करताना मालिकेत आघाडी घेतली असली तरी केवळ 110 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची कस लागला होता. पहिल्यासामन्यातून विंडीजच्या संघात पदार्पण करणाऱ्या ओशने थॉमसच्या वेगासमोर भारतीय सलामीवीरांची अक्षरशः कसोटी लागली होती. यावेळी कर्णधार रोहित शर्मा अत्यंत चांगल्या चेंडूवर चकला.

तर, शिखर धवनदेखिल उत्कृष्ट चेंडूवर बाद झाला. त्यामुळे या सामन्यात भारतीय सलामीवीर थॉमसचा कश्‍याप्रकारे सामना करतात ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे. तर, मधल्याफळीच्या चिंतेने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. कारण, टी-20 स्पेशलिस्ट समजल्या जाणाऱ्या लोकेश राहुल आणि ऋषभ पंतयांना या सामन्यात आपल्यातील चमक दाखवण्यात अपयश आले. त्यामुळे पंतकडे धोनीचा पर्याय म्हणुन पाहिले जात असताना त्याच्या अपयशाने भारतीय संघ काहिसा अडचणीत असणार आहे. तर, भरवश्‍याच्या मनिष पांडेने देखिल या सामन्यात आपल्या कर्तुत्वास साजेशी खेळी केली नसल्याने भारताच्या चिंते मध्ये आणखीनच भर पडली आहे.

मात्र, यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि पदार्पणवीर कृनाल पांड्यायांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करताना भारताला विजय मिलवून दिला नसता. तर, विराट कोहलीला विश्रांती देणे आणि महेंद्रसिंग धोनीला सामन्यातून वगळने भारतीय संघ व्यवस्थापनाच्या चांगलेच अंगलट आले असते.

तर, दुसरीकडे भारतीय गोलंदाजांना पहिल्या सामन्यातील आपली चांगली कामगिरी ही केवळ अपवादात्मक कामगिरी नव्हती हे सिद्ध करताना दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत विंडीजच्या फलंदाजांना कमीत कमी धावांमध्ये बाद करण्याचा भीम पराक्रम करावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला भुवनेश्‍वर कुमारची अनुपस्थिती खलील आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीने जाणवली नाही. मात्र, दुसऱ्या सामन्यात खलील, बुमराह आणि उमेश यादवयांना चांगली कामगिरी करत पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धावा रोखण्याचे आव्हान असणार आहे. तर, पहिल्या सामन्यात विंडीजच्या तीन फलंदाजांना मोक्‍याच्या क्षणी बाद करत कुलदीपने विंडीजला 109 धावांमध्ये रोखण्याचा पराक्रम केल्या नंतर आजच्या सामन्यातही त्याला याच कामगिरीची पुनरावृत्ती करणे गरजेचे असून पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात कृनाल पांड्यायाला अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करताना भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलावा लागणार आहे.

तर,दुसरीकडे चौथ्या एकदिवसीय सामन्यापासून विंदीजचा संघ फलंदाजांच्या अपयशाने परेशान असणाऱ्या विंडीजच्या संघाला पहिल्या सामन्यातही त्याच्यामुळेच पराभुत व्हावे लागले आहे. यावेळी विंडीजसाठी एकदिवसीय मालिकेत सातत्याने चांगली कामगिरी करणारे शाई होप आणि शेमरोन हेतमायर अपयशी ठरले आहेत. तर, बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन करणारेकायरन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो आणि कार्लोस ब्रेथवेट अपयशी ठरल्याने धोकादायक वाटणाऱ्या विंडीजच्या संघाला भारताला 109 धावांमध्ये रोखण्यात यश मिलाले आहे तर. या सामन्यात विंडीजच्या आणखिन 15 ते 20 धावा अशीक असत्या तर सामन्याचा निकाल कदाचीत उलटा लागण्याची शक्‍यता होती. त्यामुळे विंडीजला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांना या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृनाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझुवेंद्र चहाल, कुलदिप यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शहाबाझ नदीम.
वेस्ट इंडीज – कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), फॅबिएन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेतमायर, किमो पॉल, कायरन पोलार्ड, दिनेश रामदिन (यष्टीरक्षक), शेरफाने रुदरफोर्ड, ओश्‍ने थॉमस, खॅरी पिअर्रे, ओबेद मेकॉय, रोव्हमन पॉवेल, निकोलस पूरन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)