युवा खेळाडूंसमोर भारतीय गोलंदाजांची दमछाक

मुरली विजयचे दमदार शतक; राहुलची आश्‍वासक फलंदाजी

सिडनी  – तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया एलेव्हनच्या तलाच्या फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक घडवून आणताना आपल्या पहिल्या डावात तब्बल 544 धावा करत भारतीय संघाला चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 186 धावांची भली मोठी आघाडी घेतली. यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी चांगली फलंदाजी करत संघाला 211 धावांची मजल मारुन देताना सामना अनिर्णीत राखला.

चौथ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेंव्हा काल नाबाद खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया एलेव्हनच्या हॅरी निल्सन (नाबाद 56) आणि ऍरोन हार्डी (नाबाद 69) आपला डाव सुरू केला. यानंतर ऍरोन हार्डीने कालच्या आपल्या धावसंख्येत केवळ 17 धावांची भर घातली. त्याला इशांत शर्माने 86 धावांवर बाद केले. यावेळी निल्सन आणि हार्डीयांनी सातव्या गड्यासाठी 179 धावांची भागिदारी केली. ही भागिदारी तोडण्यासाठी भारताने तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला.

तर, यानंतर आलेल्या डॅनिएल फॉलिन्सला हाताशी घेत निल्सनने संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. यावेळी निल्सनने तिसऱ्या दिवसा पेक्षा अधीक वेगाने फलंदाजी करत संघाला 450 धावांचा टप्पा गाठुन देताने आपले शतकही झळकावले.

शतक झळकावल्यानंतर लागलीच कोहलीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. यावेळी निल्सनने 170 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलिया एलेव्हनच्या तळातील फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांसमोर सहजासहजी आपल्या विकेट गमावल्या नाहीत. यानंतर त्यांच्या संघाने 487 धावांवर फॉलिन्सच्या रुपाने आपला नववा गडी गमावल्यानंतर त्यांचाअ दाव 500 धावांच्याच आत गुंडाळला जाण्याची शक्‍यता वर्तवली जात असताना अखेरच्या जोडीतील लुक्‍स रॉबिन्स आणि जॅक कोलमनने 57 धावांची भागिदारी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. शेवटी विकेट पडत नसल्याचे पाहुन कोहलीने बुमराह, कुलदीप यादव आणि मुरली विजययांना गोलंदाजीस बोलावले. यानंतर बुमराहने आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॅक कोलमनला बाद करत ऑस्ट्रेलिया एलेव्हनचा डाव संपुष्टात आणला.

यानंतर प्रत्युत्तरात उतरलेल्या भारतीय संघाने आश्‍वासक सुरुवात केली. यावेळी सातत्याने अपयशी ठरणाऱ्या लोकेश राहुल आणि मुरली विजययांनी सावध परंतू वेगवान खेळी करण्यावर भर दिला. त्यामुळे दोन्ही फलंदाज बऱ्याच दिवसांनी फॉर्ममध्ये आल्याचे भासले. यावेळी राहुलने वेगवान खेळी करत आपले अर्धशतक साजरे केल्यानंतर संघाला शंभरी गाठुन दिली. राहुल शतकी खेळी करेल असे वाटत असताना खराब फटका मारुन तो बाद झाला. यावेळी राहुलने 98 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 62 धावांची खेळी केली.

यानंतर आलेल्या हनुमा विहारीला साथीत घेत विजयने संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. यानंतर विजयने वेगवान फलंदाजी करत भारतीय संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून देताना आपले शतक साजरे करत हनुमा विहारीच्या साथीत शतकी भागिदारी नोंदवली. यावेळी 129 धावांवर खेळनाऱ्या विजयला बाद करत डॅनिएल फॉलिन्सने भारताला दुसरा धक्‍का दिला. यावेळी विजयने 132 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 129 धावांची खेळी केली. विजय बाद झाल्यानंतर पंचांनी खेळ संपल्याची घोषना केली. यावेळी हनुमा विहारी नाबाद 15 धावांवर खेळत होता.

तत्पूर्वी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डॉर्सी शॉर्ट (74) आणि ब्रायंट (62) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाने भारतीय संघाला चांगलीच टक्‍कर दिली. दोन्ही संघादरम्यान सुरू असलेल्या सराव सामन्यातील तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाने भारताच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरार्थ 6 बाद 356 धावा केल्या होत्या. भारतापेक्षा ते अजून दोन धावांनी मागे होते. आणि त्यांच्या हातात 4 विकेट ग्बाकी होत्या. या चार विकेट्‌सनी यानंतर संघाला 544 धावांची मजल मारुन देत भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक घडवून आणली.

संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव 92 षटकांत सर्वबाद 358 (पृथ्वी शॉ 66, विराट कोहली 64, चेतेश्‍वर पूजारा 54, अजिंक्‍य रहाणे निवृत्त 56, हनुमा विहारी 53, ऍरोन हार्डी 4-50). ऑस्ट्रेलिया एलेवन पहिला डाव 151.1 षटकांत सर्वबाद 544 (हॅरी निल्सन 100, ऍरोन हार्डी 86, डार्सी शॉर्ट 74, मॅक्‍स बार्यन्ट 62, मोहोम्मद शमी 97-3, इशांत शर्मा 73-1, रविचंद्रन अश्‍विन 122-2, विराट कोहली 27-1, बुमराह 0-1), भारत दुसरा डाव 43.4 षटकांत 2 बाद 211 (मुरली विजय 129, लोकेश राहुल 62, हनुमा विहारी नाबाद 15, डार्सी शॉर्ट 34-1, डेनिएल फॉलिन्स 51-1). सामना अनिर्णीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)