#AUSvIND : भारताचा दुसरा डाव गडगडला

-बुमराह समोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे लोटांगण; पहिल्या डावात भारताला 292 धावांची आघाडी

मेलबर्न  – ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली असून दिवसाखेर 5 बाद 54 अशी अवस्था झाली. त्यापूर्वी जसप्रीत बुमराहने 33 धावात घेतलेल्या 6 बळींच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 151 धावांमध्येच रोखण्यात यश मिलवले होते. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 292 धावांची आघाडी मिळाली होती. मात्र, भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलो-ऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्नय घेतला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन न देता फलंदाजीसाठी आलेल्या भारताचा दुसरा डाव चांगलाच गडगडला. तिसऱ्या दिवस अखेर अवघ्या 54 धावांमध्ये निम्मा संघ तंबूत परतला असून भारताकडे एकूण 346 धावांची आघाडी आहे. सामन्यातील दोन दिवस शिल्लक असून कसोटी रंगतदार अवस्थेत पोहचली आहे.

भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केल्यानंतर 28 धावा फलकावर लागल्या असताना हनुमा विहारीला 13 धावांवर कमिन्सने बाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली हे खात न उघडता तंबूत परतले. अजिंक्‍य रहाणे हा देखील एक धाव काढून बाद झाला. कमिन्सने अवघ्या 10 धावांत 4 गडी बाद करुन टीम इंडियाच्या फलदाजीचे कंबरडे मोडले. मयांक अग्रवाल आणि रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॅझलवूडने रोहितला बाद करत टीम इंडियाची अवस्था आणखीनच बिकट केली. दिवस संपला तेव्हा सलामीवीर मयांक अग्रवाल नाबाद 28 आणि ऋषभ पंत नाबाद 6 धावा करुन मैदानावर असून त्यांच्या भागीदारीवर आता भारतीय संघाच्या आशा अवलंबून आहेत.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने बिनबाद 8 धावासंख्येवरून आज खेळाला सुरूवात केली. उपहारापर्यंत त्यांची अवस्था 4 बाद 89 अशी झाली. पहिल्या सत्रात सलामीवीर फिंच 8 धावांवर माघारी परतला. त्या पाठोपाठ मार्कस हॅरिस 22 आणि उस्मान ख्वाजा 21 धावा करून तंबूत परतले. यानंतर आलेल्या शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण उपहाराच्या विश्रांतीआधी शेवटच्या चेंडूवर मार्श 19 धावांवर बाद झाला. तर ट्रॅविस हेड देखिल 20 धावा करुण परतला.

यानंतर टीम पेन आणि पॅट कमिन्सने पुन्हा डाव सावरायला सुरूवात केली. दोघांनी 36 धावांची भागिदारी केल्या नंतर कमिन्सला 17 धावांवर असताना शमीने बाद करत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्‍का दिला. तर, पेनही 22 धावा करुन परतला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पेनने सर्वाधिक धावसंख्या केली. तर, ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावाता आले नाही. यावेळी बुमराहने 33 धावांत 6 विकेट्‌स घेतले. तर, रविंद्र जाडेजाने 2, मोहम्मद शमी व इशांत शर्माने प्रत्येकी 1 बळी घेतला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि मार्क्‍स हॅरीस यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला होता.

संक्षिप्त धावफलक –

भारत पहिला डाव 169.4 षटकांत 7 बाद 4463 घोषित (चेतेश्‍वर पुजारा 106, विराट कोहली 82, मयंक अग्रवाल 76, रोहित शर्मा नाबाद 63, पॅट कमिन्स 72-3), ऑस्ट्रेलिया पहिला डाव 66.5 षटकांत सर्वबाद 151 (टिम पेन 22, मार्कस हॅरिस 22, जसप्रीत बुमराह 33-6, रविंद्र जडेजा 45-2, मोहम्मद शमी 27-1), भारत दुसरा डाव 27 षटकांत 5 बाद 54 (मयंक अग्रवाल नाबाद 28, हनुमा विहारी 13, पॅट कमिन्स 10-4, जोश हेझलवूड 13-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)