पहिल्या कसोटीपुर्वी भारताला धक्‍का; पृथ्वी शॉ जायबंदी

सिडनी – ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेस सुरूवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉहा जायबंदी झाला असून तो पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने ट्विट करुन सांगितले आहे. यामुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान होऊ शकते. बीसीसीआयने पृथ्वी शॉच्या दुखापतीविषयी माहिती दिली असून पृथ्वी शॉच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून तपासणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे बीसीसीआयने सांगितले.

सिडनीमध्ये सुरू असलेल्या सराव सामन्यादरम्यान तिसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान सीमारेषेजवळ झेल टिपताना पृथ्वीच्या पायाला दुखापत झाली. यानंतर पृथ्वीला टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफने उचलून ड्रेसिंग रुममध्ये नेले. वैद्यकीय अहवालानंतर तो पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 6 डिसेंबरपासून भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे.

-Ads-

दरम्यान, पृथ्वी शॉने कसोटी सराव सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 69 चेंडूत 66 धावांची खेळी केली होती. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याचा सहभाग निश्‍चित समजला जात होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)