#AUSvIND : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 6 बाद 236

सिडनी – भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 236 धावांपर्यत मजल मारली असून अद्याप ते 386 धावांनी पिछाडीवर आहेत.

भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने 3 गडी बाद केले तर रविंद्र जडेजाने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीत चमक दाखवली. जडेजाने 2 गडी बाद केले तर मोहम्मद शम्मीने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मार्कस हॅरिसन 79 आणि उस्मान ख्वाजा 27 धावा काढून बाद झाले. मार्नस लबुशेन 38, शाॅन मार्श 8 आणि ट्रॅविस हेड 20 धावांवर माघारी परतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पीटर हैंड्सकाॅम्ब नाबाद 28 आणि पॅट कमिन्स 25 धावांवर खेळत आहेत. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेआधी थांबवण्यात आला. त्यामुळे आजचा उरलेला दिवस भरून काढणयासाठी पुढचे दोन दिवस सामना अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशीचा सामना पहाटे 4.30 ला सुरू होईल.

दरम्यान, चेतेश्‍वर पुजारा आणि ऋषभ पंत यांचे दीडशतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने पहिल्या डावात 167.2 षटकांत 7 बाद 622 धावांची मजल मारत आपला पहिला डाव घोषित केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)