IND VS AUS T20 : आजपासून ‘रन’संग्रामाला सुरुवात

ब्रिस्बेन  – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आजपासून टी-20 मालिकेला सुरुवात होत असून सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाकडे ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरविण्याची उत्तम संधी असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी 20 सामने, 4 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत या दौऱ्यात विजयासाठीचा दावेदार संघ म्हणूनच खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत सुमार कामगिरी करत आहे. त्यातच दक्षिण अफ्रीकेविरुद्ध झालेल्या एकमेव टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकतर्फी पराभव स्विकारला होता. त्यात दक्षिण अफ्रीकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला मालिकेतील तिन्ही प्रकारात पराभूत करताना ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पराभूत करणारा एकमेव संघ बनला होता. आता हीच संधी भारतीय संघाकडे चालून आली आहे.

कारण, सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघातील काही महत्वाचे खेळाडू संघात नाहीत. याऊलट भारताचा संघ उत्तम कामगिरी करत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी दिवसेंदिवस उजळत आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाच्या संघात अंतीम 11 खेळाडू कोण असतील हेदेखील सध्या कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या त्यांचा संघ पराभवाच्या छायेतच वावरत आहे. कारण, स्टिव्हन स्मीथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बेनक्रॉफ्टयांच्या निलंबनानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रीके विरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.

तर, दुसरीकडे सध्या भारतीय संघ लयीत असून भारताने नुकत्याच झालेल्या आशिया चषकात पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशचा पराभव केला होता. तर, त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यातही भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला होता.

त्यातच भारतीय संघाने सामन्याच्या आदल्याच दिवशी आपल्या संघाची घोषणा करत ऑस्त्रेलियाच्या संघावर दडपन वाढवले आहे. भारताने पहिल्या टी-20 सामन्यासाठी 12 खेळाडूंचा संघ निवडला आहे. ज्यात नवोदित यष्टिरक्षक ऋषभ पंत कडे यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली गेली आहे. तर, दिनेश कार्तिकही संघात आहे. त्यांच्या व्यतिरीक्त कृणाल पांड्या, कुलदीप यादव आणि युझूवेंद्र चहलया तीन फिरकी गोलंदाजांना संधी मिळाली असून यापैकी एकाला उद्याच्या सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता आहे.

तर, फलंदाजीत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर भारतीय संघाची भिस्त असणार आहे. तर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि खलील अहमदयांच्या कडे वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवण्यात आलेली आहे.

तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ अफ्रीकेविरुद्धच्या सामन्यातील पराभवापासून धडा घेत आजच्या सामन्यात एक अतिरीक्त फिरकी गोलंदाज खेळवण्याची शक्‍यता आहे. कारन अफ्रीके विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने केवळ वेगवान गोलंदाज खेळवले होते. तर, ग्लेन मॅक्‍सवेलने त्यांच्या फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळली होती.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि युझूवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), ऍश्‍टॉन अगर, जेसन बेहेरेनड्रॉफ, ऍलेक्‍स केरी, नॅथन कुल्टर-नाईल, ख्रीस लिन, बेन मॅकडेरेमोट, ग्लेन मॅक्‍सवेल, डार्सी शॉर्ट, बिली स्टॅंक्‍ले, मार्कस स्टोईनिस, अँड्रयु टाई, ऍडम झम्पा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)