मालिका वाचवण्याचे भारतापुढे आव्हान

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना

मेलबर्न – पहिल्या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतरही भारतीय संघाला पराभुत व्हावे लागल्यानंतर तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली असून आजच्या सामन्यात विजय म्निळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरीकरत मालिका वाचविण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

यजमान ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या टी-20 सामन्यात भारताला चार धावांनी पराभूत करताना दौऱ्याची दणक्‍यात सुरुवात केली. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांना 1-0 अशी आघाडी मिळाली आहे त्यामुळे पुढील सामन्यांसाठी त्यांचे मनोबल उंचावलेले आहे. त्यातच पहिल्या सामन्यात भारतीय संघाने खराब क्षेत्ररक्षण करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला धावा आणि बळी बहाल केल्याचाही फटका संघाला या सामन्यात बसला होता. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या सामन्यात काहिसा बॅकफूटवर गेलेला भसला.

लागोपाठ सात टी-20 सामन्यांच्या मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाला आठवी मालिका जिंकून रेकॉर्ड करावयाचे असल्यास आजच्या सामन्यात विजय मिळवने भारतीय संघाला अनिवार्य असणार आहे. मालिका सुरु होण्यापुर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला कमी लेखत भारतीय संघ सहज ही मालिका जिंकेल असा कयास अनेक क्रिकेट पंडीतांनी लगावला होता. मात्र, पहिल्या सामन्यात ग्लेन मॅक्‍सवेल, मार्कस स्टोईनिस आणि ऍडम झम्पायांनी उत्कृष्ट कामगिरी करताना भारतीय संघाला पराभुत केले.

त्यातच भारताच्या वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकी गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आल्याने भारतीय संघाला त्याचा फटका बसला. कारण, भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला जास्त धावा दिओल्या नव्हत्या त्यामुळे त्यांच्यावर भरपूर दबाव आला होता. मात्र, त्यानंतर खलील अहमद आण्इ कृनाल पांड्यायांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यात अपयश आल्याने त्यांनी आपल्यावरील दबाव झटकून देत वेगवान फलंदाजी केली. त्याचा फायदा त्यांना डकवर्थ लुईस नियमासाठी झाला. आणि त्यांच्या धावा सुधारीत पद्धतीने वाढवित भारतीय संघापुढे 17 षटकांत 174 धावांचे भले मोठे आव्हान ठेवन्यात आले. त्यामुळे फलंदाजांना सुरुवातीपासूनच दबावात खेळावे लागले.

तसेच इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील नाबाद 101 धावांच्या खेळीनंतर तब्बल सहा सामन्यांमध्ये भारताच्या लोकेश राहुलला 30 धावांचा टप्पा एकदाही पार करता आलेला नाही तरी भारतीय संघात त्याची वर्णी लागते आहे. तर, त्याच्या इतकाच धडाकेबाज फलंदाज मनिष पांडेला मात्र एका सामन्यातील अपयशामुळे बाहेर बसावे लागते आहे. त्याबद्दल भारतीय संघ व्यवस्थापनाने अंतीम संघ निवडताना कालजी घेणुआची गरज आहे.

त्यातच पहिल्या सामन्यात युझुवेंद्र चहलच्या जागी कृनाल पांड्याची वर्णी लागली होती. मात्र, पांड्याने आपल्या चार षटकांमध्ये तब्बल 55 धावा दिल्या ज्यात सहा षटकारांचा समावेश होता. त्यामुळे जर गाबाच्या खेळपट्टीप्रमाणेच एमसीजीची खेळपट्टीअसेल तर भारतीय संघात कृनाल ऐवजी चहलला स्थान मिळने अपेक्षित आहे.

मात्र, जर पांड्याला बाहेर बसवले तर संघाला एका अतिरिक्त फलंदाजाची कमतरता भासेल. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी संघ निवड करताना भारतीय संघाच्या निवड करताना विराट आणि व्यवस्थापन समितीसमोर मोठा पेच प्रसंग असणार आहे. त्यातच जर भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही सुधारणा करणे भारतीय संघाला गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि युझूवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), ऍश्‍टॉन अगर, जेसन बेहेरेनड्रॉफ, ऍलेक्‍स केरी, नॅथन कुल्टर-नाईल, ख्रीस लिन, बेन मॅकडेरेमोट, ग्लेन मॅक्‍सवेल, डार्सी शॉर्ट, बिली स्टॅंक्‍ले, मार्कस स्टोईनिस, अँड्रयु टाई, ऍडम झम्पा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)