पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका : दिवस अखेर 6 बाद 277 धावांची मजल

पर्थ – वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन सलामीवीरांसह मधल्या फळीतील फलंदाजांनी सावध पणे फलंदाजी करताना दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवस अखेर 6 बाद 277 धावांची मजल मारताना पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियान सलामीवीरांनी संघाला सावध सुरूवात करुन दिली. खेळपट्टीवर भरपुर हिरवे गवत असल्याने आजच्या सामन्यात भारताने चार जलदगती गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. मात्र, “ड्रॉप ईन’ पध्दतीने बसवण्यात आलेल्या खेळपट्टीवर चेंडू ना उसळी घेत होता ना स्विंग होत होता. त्यातच ऍरोन फिंचला जीवदान मिळाल्या मुळे भारताला लंच टाईम होउ पर्यंत एकही बळी मिळवता आला नाही.

यानंतर फिंच आणि मार्कस हॅरिसयांनी दमदार शतकी भागिदारी नोंदवताना आपापली अर्धशतके झळकावली. सुरुवातीला जीवनदान मिळालेला ऍरोन फिंच 50 धावांनंतर लगेचच बाद झाला. त्याला बुमराहने पायचीत केले. बाद होण्यापुर्वी फिंच आणि हॅरिसयांनी पहिल्या गड्यासाठी 35.2 षटकांत 112 धावांची भागिदारी केली. पहिल्या सत्रात विकेटच्या शोधात असलेल्या भारताला लंचनंतर पहिले यश मिळाले.

फिंच बाद झाल्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजाला साथित घेत हॅरिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ख्वाजा जास्तकाळ खेळपट्टीवर टिकाव धरु शकला नाही आणि 38 चेंडूत 5 धावांची संथ खेळी करुन परतला. ख्वाजाला उमेश यादवने बाद केले. ख्वाजा बाद झाल्यानंतर केवळ 4 धावांची भर घालून मार्कस हॅरिस देखिल परतला. हॅरिसने 141 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. यानंतर हॅंड्‌सकोम्बलाही जास्त चमक दाखवता आली नाही. आणि तो केवळ 7 धावाकरुन परतला. लागोपाठ बळी गेल्याने बीनबाद 112 धावांवरुन त्यांची चार बाद 148 अशी अवस्था झाली होती.

यानंतर शॉन मार्श आणि ट्रॅविस हेड यांनी चहापानानंतर अडचणीत सापडलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न सुरु केला. हे दोघे ऑस्ट्रेलियाला चांगली धावसंख्या उभारुन देणार असे वाटत असतानाच भारताच्या हनुमा विहारीने ही जोडी फोडली. विहारीने या डावात पुन्हा एकदा जमलेली जोडी फोडून भारताला दिलासा दिला. अर्धशतकवीर हॅरिसला बाद करत विहारीने भारताला मोठे यश मिळवून दिले होते. त्यानंतर मार्शला तंबूचा रस्ता दाखवत त्याने स्थिरस्थावर झालेली जोडी फोडली. मार्शने सहा चौकारांच्या जोरावर 45 धावा फटकावल्या.

यावेळी मार्श आणि हेडयांनी पाचव्या गड्यासाठी 84 धावांचीमहत्वपूर्ण भागिदारी केली. मार्श बाद झाल्यानंतर हेडने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, यावेळी त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याला इशांत शर्माने 58 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. दिवस संपण्यासाठी काही षटके शिल्लक असताना कर्णधार टिम पेन आणि पॅट कमिन्स यांनी ती खेळून काढली. त्यामुळे पहिला दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 277 धावा झाल्या होत्या. यावेळी भारताकडून विहारी आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. जसप्रीत बुमरा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक फलंदाजाला बाद केले.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : 90 षटकांत 6 बाद 277 (मार्कस हॅरिस 70, ट्रॅविस हेड 58, ऍरोन फिच 50, शॉन मार्श 45, इशांत शर्मा 35-2, हनुमा विहारी 53-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)