भारताला पराभूत करण्याची सुवर्ण संधी : फिंच

ब्रिस्बेन – सध्या आमच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्हन स्मीथ सहभागी नसले तरी आमचा संघ कमजोर नाही. तसेच, ही मालिका जिंकून आगामी संपुर्ण दौऱ्यात भारतीय संघावर दडपन आणन्याच्या दृष्टीने आमच्या साठी टी-20 मालिका ही सुवर्णसंधी आहे. असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज ऍरोन फिंच याने केले आहे.

आज पासून भारत आण्इ ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्या संदर्भात बोलताना ऍरोन फिंचने सांगितले की, टी-20 मध्ये शक्‍यतो पाहुणा संघहा दबावात असतो आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी बोलताना फिंच म्हणाला की, आम्ही टी-20 साठी एक चांगला संघ निवडलेला असून आमच्या संघाने मागिल काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे.

जरी आम्ही पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिका गमावली असली तरी आम्ही त्यानंतरच्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यात चांगली कामगिरी केली आहे. तर, न्युझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेतही आम्ही चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचा फायदा निश्‍चीतच आमच्या संघाला या मालिकेत होनार आहे.

भारतीय संघ गत काही काळापासून चांगल्या फॉर्म मध्ये असला तरी आमच्यासाठी मुक्तपणे आणि दबाव रहित खेळण्याची हिच संधी आहे. आणि आम्ही याचा निश्‍चीतच फायदा घेऊ हेही तितकेच खरे आहे. टी-20 मध्ये संघ निवडही मैदानाच्या आकरानुसार आणि खेळपट्टीच्या रचने नुसार केली जाते.

आम्ही खेळपट्टीची रचना पाहुनच अंतीम संघाची निवड करणार आहोत असेही फिंचने यावेळी सांगितले. तसेचत्याने यावेळी बोलताना सांगितले की, अंतीम संघात ऍडम झम्पा अथवा ऍश्‍टॉन अगर यांच्या मधून एका फिरकी गोलंदाजाची निवड करावयाची आहे. तर, मॅक्‍सवेल आमच्यासाठी अर्धवेळ फिरकी गोलंदाजाची जबाबदारी सांभाळताना दिसून येइल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)