IND vs AFG: पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवला

बंगळुरू – भारत विरुद्ध अफगाणिस्तानचा कसोटी सामना पावसाचा व्यत्यय आल्याने थांबविण्यात आला आहे. सलामीवीर धवनचे शतक आणि त्याला मिळालेल्या विजयच्या साथीमुळे भारताने खेळाची चांगली सुरुवात केली.

शिखर धवन 96 चेंडूत 107 धावा करुन बाद झाला आहे. भारताची धावसंख्या 1 बाद 250 अशी असून मुरली विजय (99) तर लोकेश राहुल (44) धावांवर खेळत आहे. कर्णधार अजिंक्‍य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर धवन आणि मुरली विजयने सार्थ ठरवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)