LIVE : Ind v/s WI : ‘शतकी’ खेळी करून पृथ्वी शॉ माघारी

राजकोट: चार वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका खेळणाऱ्या वेस्ट इंडीजसमोर मायदेशात नेहमीच जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचे आव्हान आहे. मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ याला राजकोट कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेली आहे. दरम्यान नाणेफेक जिंकून भारताने या सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

– नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय

-Ads-

–  भारताला पहिला धक्का लोकेश राहुल माघारी. वेस्ट इंडीजच्या शेनॉन गॅब्रिएलने टिपला पहिला बळी.

– लोकेश राहुल तंबूत परतल्यानंतर पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजाराने सावध पवित्र घेत शतकी भागीदारी रचली. शिवाय पृथ्वी शॉने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.

– पहिला कसोटी सामन्यात उपहारापर्यंत भारताच्या १ बाद १३३ धावा. पृथ्वी शॉ ७५ तर चेतेश्वर पुजारा ५६.

– पृथ्वी शॉने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले आहे. या शतकाला १५ चौकारांचा साज होता. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी पंधरावा खेळाडू ठरला आहे. भारत सध्या १८० धावा १ बाद

– चेतेश्वर पुजारा ८६ धावांवर बाद. लुईसच्या चेंडूवर पुजारा बाद.

– पुजारा पाठोपाठ शतकवीर पृथ्वी शॉही (१३४) तंबूत परतला. देवेंद्र बिशूच्या चेंडूवर बाद.

– चहापानापर्यंत भारत २३२ धावा ३ बाद.

– विराट कोहली व अजिंक्य राहणे मैदानात. भारत २९६ धावा ३ बाद.

प्रतिस्पर्धी संघ –

भारतीय संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव व शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडीज संघ – जेसन होल्डर (कर्णधार), सुनील ऍम्ब्रिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टॉन चेस, शेन डाऊरिच, शेनॉन गॅब्रिएल, जहमार हॅमिल्टन, शिमरॉन हेतमायर, शाई होप, शर्मन लेविस, किमो पॉल, केमार रोच व जोमेल वॉरिकन.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)