गोव्यात भाजप आणि मित्रपक्षांमध्ये वाढती अस्वस्थता 

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीतूनच नेतृत्वबदलाची मागणी होत आहे. अशातच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका त्या आघाडीतील घटक असणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) केली आहे. त्या घडामोडींमधून आघाडीत अस्वस्थता वाढीत लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मागील महिन्यात सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे या आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी मगोपने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, मित्रपक्षाची ती कृती भाजपला रूचलेली नाही. त्यातून मगोपच्या कृतीचा प्रदेश भाजपने निषेध केला आहे. मगोपने उचललेल्या पाऊलामुळे सत्तारूढ आघाडीतील इतर घटक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

आपले आमदार गमावण्याची भीती मगोपला वाटत आहे, अशी टीका भाजपने केली आहे. या टीकेमुळे भाजप आणि मगोपमधील संबंध ताणले जाण्याची शक्‍यता आहे. मगोपने याआधीच गोव्यात नेतृत्वबदल करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर, मगोपने मंत्री असणारे आपले नेते सुदीन ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्याचीही मागणी पुढे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)