रेरा, नोटाबंदी आणि जीएसटीच्या परिणामापासून रिअल इस्टेट आता बाहेर पडले असून 2019 मध्ये घराच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता मालमत्ता सल्लागार संस्था बीआरईने व्यक्त केली आहे.
बीआरईच्या मते, रिअल इस्टेट बाजार हा जीएसटी, रेरा, नोटाबंदी या सारख्या धोरणात्मक सुधारणांच्या प्रभावात तावून सुलाखून निघाला आहे. आता त्याची वाटचाल विकासाकडे होत आहे. निवास, व्यावसायिक कार्यालय, ठोक आणि लॉजिस्टिकसह सर्व क्षेत्र मिळून 2019 मध्ये एकूण 20 कोटी चौरस फूट जागा नव्याने जोडली जाईल. भारत-रिअल इस्टेट बाजार स्थिती-2019 च्या अहवालात म्हटले की, भारतात रिअल इस्टेटची मालमत्तेचा साठा यावर्षाच्या अखेरीस वाढून तो 3,700 अब्ज चौरस फुटांपर्यंत जाईल.
तंत्रज्ञानाची मागणी आणि पूर्ततेची स्थिती, इज ऑफ डुइंग बिझनेसच्या रॅकिंगमध्ये सुधारणा आणि जीएसटी, रेरासह अन्य सुधारणांचा प्रभाव आणि त्याचे परिणाम यासारख्या विविध प्रकरणातून भारतीय रिअल इस्टेट बाजार बाहेर पडेल. या आधारावर नवीन घराच्या मागणीतीलपूर्ततेत 15 टक्के आणि विक्रीत 13 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेटच्या विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय वाढीच्या आधारावर 2019 मध्ये सुमारे 20 कोटी चौरस फूट अतिरिक्त रिअल इस्टेट बाजार तयार होईल. त्यात कार्यालय, ठोक, निवासी आणि अन्य सुविधांचा समावेश असेल.