वाढतेय होम ऑटोमेशनची क्रेझ (भाग-१)

सध्याचे युग तंत्रज्ञानाचे असून, कार्यालय असो वा घर अनेक उपकरणे स्वयंचलित असावीत याकडे कल असतो. घराचे ऑटोमेशन किंवा डोमोटिक्‍स हा फंडा त्यातूनच आलेला आहे. यात एकाच कंट्रोल पॅनेलच्या माध्यमातून घरातील विविध उपकरणे आणि कामे संचालित करता येतात. मात्र, तज्ज्ञांच्या मदतीने ऑटोमेशन करणे आणि योग्य सॉफ्टवेअरची निवड करणे ही दोन पथ्ये पाळणे आवश्‍यक आहे.

राहत्या घरात कोणत्या सुखसुविधा असाव्यात, याबाबतच्या अपेक्षा काळानुरूप बदलत आहेत. आता सर्वत्र तंत्रज्ञानाचा बोलबाला असल्यामुळे घरातही बऱ्याच गोष्टी “ऑटोमॅटिक’ असाव्यात असे अनेकांना वाटू लागले आहे. घराचे नूतनीकरण किंवा नव्या घराची रचना हायटेक असावी म्हणून आता “होम ऑटोमेशन’ हा नवा फंडा लोकप्रिय होत आहे. होम ऑटोमेशनलाच “डोमोटिक्‍स’ असेही नाव दिले जाते. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, घरातील अधिकांश उपकरणे स्वयंचलित असावीत आणि घरातील कामकाज सुरळीतपणे चालावे, यासाठी अत्याधुनिकीकरण करणे म्हणजे डोमोटिक्‍स होय. या तंत्रात घरातील सर्व उपकरणांचे संचालन एकाच ठिकाणाहून होऊ शकेल, अशी सुविधा असते. या तंत्राच्या मदतीने एकाच कंट्रोल पॅनेलच्या साह्याने सर्व घरातील दिवे, हिटिंग, व्हेन्टिलेशन, एअर कंडिशनिंग, वेगवेगळी उपकरणे आणि अन्य वस्तूंचे नियंत्रण केले जाते. जीवन अधिकाधिक आरामदायी बनविण्यासाठी ऑटोमेशनचा फंडा लोकप्रिय होत आहे; परंतु केवळ आरामदायी जीवनासाठीच हे आवश्‍यक आहे असे नाही, तर यामुळे ऊर्जाबचतही मोठ्या प्रमाणावर करता येते. त्याचप्रमाणे घराची आणि आतील उपकरणांची सुरक्षितताही ऑटोमेशनमुळे पक्की होते.

वाढतेय होम ऑटोमेशनची क्रेझ (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

होम ऑटोमेशन प्रणाली घरातील सर्व विद्युत उपकरणांना एकत्र जोडते. याअंतर्गत वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानात बिल्डिंग ऑटोमेशनबरोबरच घरगुती कामकाजाचेही संचालन समाविष्ट करता येते. उदाहरणार्थ, होम एन्टरटेन्मेन्ट सिस्टिम, गार्डन एरिया किंवा बागेला पाणी देणे, पाळीवप्राण्यांना खाऊ-पिऊ घालणारी स्वयंचलित उपकरणे, वातावरणास अनुकूल प्रकाश योजनेत बदल करणे किंवा घरगुती कामांसाठी यंत्रमानवांचा उपयोग करणेही या प्रणालीत अंतर्भूत आहे. यात सर्व उपकरणांना एका संगणक नेटवर्कशी जोडण्यात येते, जेणेकरून एकाच पर्सनल कॉम्प्युटरच्या साह्याने सर्वच उपकरणे संचालित करता यावीत. त्यामुळेच घरात कुणी नसल्यास घरापासून दूरवर अंतरावरूनही इंटरनेटच्या साह्याने घरातील उपकरणे संचालित करणे शक्‍य होते. त्याचप्रमाणे या प्रणालीच्या साह्याने आपण घरात नसताना घरातील कामकाजावर इंटरनेटच्या माध्यमातून देखरेखही करता येते. घरातील वातावरण, विविध प्रणाली आणि उपकरणे यांची माहिती तंत्रज्ञानाशी सांगड घातल्याने आपण एकाच वेळी, एकाच ठिकाणी बसून सर्व प्रणाली हाताळू शकतो. त्या नियंत्रित करू शकतो.
भारतीय घरांमध्ये पारंपरिक विद्युत उपकरणांच्या तुलनेत आता ऑटोमेशन प्रणाली बसविण्याकडे कल झपाट्याने वाढू लागला आहे.

– राकेश माने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)