साखर कारखान्यांचा वाढेल नफा : इक्रा

वाढीव विक्री किमतीचा परिणाम; कारखाने शेतकऱ्यांची थकबाकी देतील

मुंबई – केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत 2 रुपयांनी वाढवून 31 रुपये प्र्रति किलो केली आहे. त्यामुळे साखर कारखान्याच्या कार्यचालन नफ्यात 6 टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. सध्या साखरेचे उत्पादन जास्त झाल्यामुळे साखरेचे भाव कमी होत आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचा महसूल कमी होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्याचे देणे अवघड होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची साखर कारखान्याकडील थकबाकी वाढली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने इतरही काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर आता किमान विक्री दर वाढवून दिला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे ताळेबंद काही प्रमाणात सुधारण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

या घडामोडीचे विश्‍लेषण करताना इक्रा या संस्थेने सांगितले की, यामुळे साखर कारखान्यांना प्रत्येक किलोमागे 2 रुपयांचा नफा वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात सुधारू शकणार आहे. सध्या साखरेला केवळ 29 रुपये प्रति किलो असा भाव साखर कारखान्यांना मिळतो. त्यामुळे साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्या.चे 20 हजार कोटी रुपये थकले आहेत. यामुळे शेतकरी आणि साखर कारखान्यांना लाभ होणार आहे. अशा प्रकारची उपाययोजना या अगोदरच केली असती तर परिस्थितीत आणखी सुधारणा झाली असती, असे इक्राने म्हटले आहे.

या वर्षीही साखरेचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त होणार असून ते 30.7 दशलक्ष टन होण्याची शक्‍यता आहे. भारताला वर्षाला साधारणपणे 25.8 दशलक्ष टन एवढी साखर लागते. गेल्या वर्षाची 12 दशलक्ष टन एवढी साखर शिल्ल्क आहे. त्यामुळे सरखरेचे भाव आणखी पडण्याची शक्‍यता वाढल्यामुळे सरकारने ही उपाययोजना केली आहे.

सरकारने एमएसपीमध्ये 2 रुपयांनी वाढ करून 231 रुपये प्रति किलो इतकी केली आहे, असे गेल्या आठवड्यात अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले होते. मएसपीपेक्षा कमी किमतीला साखर कारखाने खुल्या बाजारात घाऊक व्यापाऱ्यांना आणि अन्न उद्योगांना साखरेची विक्री करू शकत नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून मिळणे अपेक्षित असलेली थकबाकी जानेवारीअखेर 20 हजार कोटी इतकी होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)