महाराष्ट्रात पारा वाढला, उन्हाची काहिली आणखी वाढणार

संग्रहित छायाचित्र

पुणे – राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसत आहे. येत्या काही दिवसात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागातून देण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून उन्हाचे चटके वाढत असल्याचे जाणवत होते. कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होताना यावेळी दिसत आहे. वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद आज झाली आहे.  सांगली, सोलापूर, परभणी, बीड या भागातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोकण विभाग वगळता राज्यातील इतर ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. तर मुंबईचे कमाल तापमान आज ३९ अंश सेल्सिअस असल्याने मुंबईकरांना आज उन्हाची चांगलीच तीव्रता जाणवणार आहे. अहमदनगर, अमरावती, नाशिक आणि पुणे येथे कमाल तापमान ३६ अंश ते ४० अंश सेल्सिअस आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कमाल तापमान अंश सेल्सिअस मध्ये –

मुंबई ३९,अलिबाग ३८,रत्नागिरी ३२,पुणे ४०,नगर ३७,जळगाव ४०,कोल्हापूर ३६,महाबळेश्वर ३१,मालेगाव ३९,नाशिक ३३,सांगली ३६,सातारा ३७,सोलापूर ४०,उस्मानाबाद ३८,औरंगाबाद ३८,परभणी ३८,नांदेड ४०,बीड ३८,अकोला ४०,अमरावती ४०,बुलढाणा ३६,चंद्रपूर ४०,गोंदिया ३७,नागपूर ३९,वर्धा ४१,यवतमाळ ३९

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)