‘जेट’मुळे वाढले विमान तिकिटांचे ‘रेट’

देशांतर्गत प्रवासासाठी सरासरी 2 हजारांनी भाववाढ

पुणे – दिवाळखोरीत निघालेली जेट एअरवेजची सेवा स्थगित केल्यामुळे अन्य विमानांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. देशांतर्गत विमानांच्या दरामध्ये वाढ झाल्याने विमान प्रवास महागला आहे.

सध्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या जेट एअरवेजची पुणे विमानतळाहून दैनंदिन 21 उड्डाणे होत होती. मात्र आता त्याची संख्या शुन्यावर आली आहे. याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी विमानतळ प्रशासनाने जेट एअरवेजचे “स्लॉट’ अन्य कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, उपलब्ध उड्डाणांच्या तुलनेत जास्त पटीने वाढवण्यात आले आहेत. इतके करूनही तिकिटांचे दर वाढल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

जेट एअरवेजकडून पुणे विमानतळाहून जयपूर, चेन्नई, बंगळुरू, कोलकत्ता, दिल्ली आदी मार्गांवर सेवा देण्यात येत होती. त्यामुळे प्रामुख्याने या मार्गांवरील दर वाढले आहेत. पुणे-कोलकत्ता, पुणे-दिल्ली या मार्गांवरील तिकीटांचे दर सुमारे साडेचार हजारांहून साडेसहा हजारांच्या घरात पोहोचली आहे. तर पुणे-बंगळुरू मार्गाचे दर अडीच हजारांवरून थेट साडेचार हजारांपर्यंत वाढले आहेत. पुणे-जयपूर मार्गावरील दरांनी साडेतीन हजारांहून थेट साडेसहा हजारांवर झेप घेतली आहे. पुणे-चेन्नईचे दर साडेतीन हजारांहून सहा हजारांवर गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)