स्टार्टअप्‌साठी करप्राप्त गुंतवणूक आणि उलाढालीची मर्यादा वाढविली

मरगळलेल्या स्टार्टअप्‌मध्ये संचारला उत्साह

नवी दिल्ली – केंद्र सरकारने स्टार्ट अप्‌ उद्योगांत होणाऱ्या गुंतवणुकीवर अँजेल कर लावला होता. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेल्या स्टार्ट अप्‌च्या उमेदीवर पाणी पडले होते. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, असे उद्योजकांच्या संघटनांनी सुचविले होते. त्यावर विचार करण्याचे आश्‍वासन अर्थसंकल्पात देण्यात आले होते. त्यानुसार केंद्र सरकारने आज स्टार्ट अप्‌साठी कर प्राप्त गुंतवणुकीची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे स्टार्ट अप्‌ बिरादरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने अगोदर या क्षेत्रातील 10 कोटीपेक्षा जास्त गुंतवणुकीवर कर लावला होता. आता ती मर्यादी वाढवून 25 कोटी रुपये करण्यात आली आहे. ही माहिती उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून स्टार्ट अप्‌ना करभरणा करण्यासाठी नोटिसा पाठविण्यात येत होत्या. अगोदर 25 कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या नव्या उद्योगांना स्टार्टअप समजले जात होते. आता ही मर्यादी 100 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आपण या नव्या तरतुदीनुसार कर भरण्याची गरज नाही, असे प्रतिज्ञापत्र स्टार्ट अप्‌नी दिल्यास त्यांच्याकडून कर मागितला जाणार नसल्याचे प्रभू यांनी यावेळी बोलताना सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भारतात नव्या तंत्रज्ञानावर आधारित छोट्या उद्योगांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातल्या त्यात परदेशात शिकून किंवा अनुभव घेऊन आलेले तरुण असे उद्योग सुरू करीत आहेत. त्यांच्यामुळे बऱ्याच प्रमाणात रोजगार वाढत आहे. मात्र, या उद्योगात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीबाबत काही शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्यानंतर या उद्योगावर कर लावण्याची संकल्पना 2012 मध्ये पुढे आली होती. त्याला अँजेल कर असे संबोधले जाऊ लागले होते. त्यामुळे या क्षेत्रात नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. काही उद्योजकांनी परदेशात जाऊन स्टार्टअप सुरू करण्याचे प्रयत्न चालू केले होते. मात्र आता त्यांना भविष्यात तशी गरज पडणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांनी प्रतिक्रिया व्यक्‍त करताना सांगितले.

“अँजेल करामुळे स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांच्या पायात साखळदंड बांधले गेले होते. उशिरा का होईना केंद्र सरकारने या कराची दाहकता कमी केली आहे. त्यामुळे मोठ्या महानगरातील स्टार्टअपची संख्या वेगाने वाढणार आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. सरकारने दिलेल्या या संधीचा देशातील तरुण लाभ घेत आहेत.
-पद्मजा रूपारेल, सहसंस्थापक, इंडियन अँजेल नेटवर्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)