निवृत्तीच्या वयामध्ये वाढ, शाळांचे विलीनीकरण 

देशाची लोकसंख्या वाढीचा वेग आगामी दोन दशकांमध्ये मंदावणार आहे. त्यामुळे निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्यात यावी आणि शाळांचे विलीनीकरण करण्यात यावे, असे आर्थिक पहाणी अहवालामध्ये सुचवण्यात आले आहे. लोकसंख्येतील हा बदल लक्षात घेता 2030 पर्यंत काही राज्यांमध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक असेल.

देशभरातील जन्मदरामध्ये घट झाल्याने 0 ते 19 या वयोगटातील बालकांचे प्रमाण सर्वाधिक असेल. सध्या एका महिलेमागील सरासरी जन्मदर 2.1 बालक इतका आहे. दक्षिणेकडील राज्ये, हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये हा जन्मदर कमी आहे.
उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशात हा जन्मदर अधिक आहे. पण तो देखील आता कमी होतो आहे. त्यामुळे सक्रिय असणाऱ्या व्यक्‍तींचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे निवृत्तीचे वय वाढवण्यात यावे. तर मुलांच्या तुलनेत शाळांची संख्या अधिक असेल. म्हणून शाळांचे विलीनीकरण करण्यात यावे असे सुचवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)