चालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र सोमवारी कायम राहिले. त्या इंधनांमध्ये लिटरमागे अनुक्रमे 38 आणि 49 पैशांची वाढ झाली. दोन्ही इंधनांचे दर सलग पाचव्या दिवशी वाढले. चालू महिन्यात त्यांच्यात सहाव्यांदा वाढ झाली.
काही काळ इंधनांच्या दरांमध्ये घसरण झाली. त्यानंतर चालू महिन्यात सर्वप्रथम 7 जानेवारीला दरवाढ झाली.

नवीन वर्षात आतापर्यंत पेट्रोल 1 रूपया 84 पैशांनी तर डिझेल डिझेल 2 रूपये 2 पैशांनी महागले आहे. ताज्या दरवाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 70 रूपयांच्यावर गेले. त्या शहरात डिझेलचा दर 64 रूपये 18 पैसे इतका झाला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 75.77 रूपयांवर तर डिझेल 67.18 रूपयांवर पोहचले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)