इगतपुरी रेल्वेमार्गाच्या मेगा ब्लॉकमध्ये वाढ

पुणे – इगतपुरी येथील रेल्वे लाईनवर मध्य रेल्वेच्यावतीने विविध कामांसाठी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकला 30 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे तात्पूरत्या स्वरुपात पुणे-भुसावळ ही गाडी दौंड-मनमाड मार्गे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

इगतपुरी रेल्वे लाईनवर विविध कामे सुरू असल्याने मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. 26 ऑक्‍टोबरपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, काही कामे करणे सुरू असल्याने याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यामुळे 11025/11026 या पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. प्रवाशांनी बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)