उत्सवामुळे खरेदी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ 

नवी दिल्ली  -जागतिक बाजारात सोन्याचे दर स्थिर असले तरी भारतात उत्सवांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांबरोबरच व्यापाऱ्यांकडूनही सोन्याची खरेदी होत असल्यामुळे सोन्यांच्या दरात वाढ चालूच आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली.

शनिवारी सोन्याचे दर 20 रुपयांनी तर चांदीचे दर 30 रुपयांनी वाढले. दिल्ली सराफात शनिवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 20 रुपयांनी वाढून 32500 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले. तर शुद्ध सोन्याचे दर 20 रुपयांनी वाढून 32650 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. चांदीला दागिने उत्पादकाबरोबरच उद्योग क्षेत्रांकडूनही मागणी चालूच आहे. त्यामुळे शनिवारी तयार चांदीचे दर 20 रुपयांनी वाढून 39530 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले.

जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.3 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 0.03 टक्‍क्‍यांनी कमी झाले. जागतिक व्यापारयुद्ध, चलनबाजारातील अस्थिरता, काही देशादरम्यान वाढलेले तणाव या कारणामुळे शेअर, चलनबाजारात अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)