पोलीसही हतबल ः एकाच दिवशी पाच गुन्हे दाखल
दोन अल्पवयीन मुलींना पळवले
अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या प्रकारामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी उघडकीस आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी येथील गव्हाणे वस्ती परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळूवन नेल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर वाकड परिसरातही एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी – ओद्यौगिक नगरी म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची ओळख हळू-हळू “क्राईम सिटी’ होत आहे. गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना वाढत असतानाच आता महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहर खरेच सुरक्षित आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जावू लागला आहे. सोमवारी शहरात एकाच दिवसात महिलांवरील अत्याचाराबाबतचे वेगवेगळ्या पाच घटना समोर आल्या आहेत. मागील काही वर्षांपासून या औद्योगिक नगरीला लागलेले गुन्हेगारीचे ग्रहण स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरही संपलेले नाही. उलट लूटमार, चोऱ्या, तसेच गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होत असतानाच आता महिलांवरील अत्याचाराच्या घटनामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
भोसरी येथे 28 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी रामपाल थानाराम मेघवाल (वय-30) रा. केशरसिंह गुडा, राजस्थान याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये खालुंब्रे ता. खेड येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दमदाटी करुन बलात्कार केल्याप्रकरणी मुकुंद पोपट पिंगळे याच्याविरोधात चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, रहाटणी येथेही एका 30 वर्षिय महिलेवर तिच्या इच्छेविरोधात शारिरिक संबध प्रस्तापित केल्याप्रकरणी रहाटणी येथील अरुण छगनलाल राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील या तिन्ही घटना एकाच दिवशी उघडकीस आल्या आहेत. विनयभंगाचेही 2 गुन्हे पिंपरी येथे 26 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विकास उर्फ बंटी मधूकर चंदनशिवे (वय-29) रा. रमाईनगर पिंपरी याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये 30 वर्षीय महिलेच्या मोबाईलवर अश्लील संदेश तसेच व्हिडीओ कॉल करुन अश्लील कृत्य केले.