“आरटीओ”तील अपुरे मनुष्यबळ पुन्हा ऐरणीवर

मालवाहतूकदार आंदोलनाच्या तयारीत

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहनाच्या नोंदणीसाठी लागणारा वेळ, लायसन्स, वाहन पडताळणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी महिनोंमहिने “वेटिंग’ करावे लागत आहे. या आणि अन्य विषयांवर मालवाहतूकदार आंदोलनाच्या तयारीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरटीओतील अपुऱ्या मनुष्यबळचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. आरटीओत तात्पुरत्या स्वरुपात का होईना, कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन कामकाज करावे, यासह विविध मागण्यांसाठी वाहतूकदार संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहन चालक मालक प्रतिनिध महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
आरटीओमध्ये सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे दैनंदिन कामकाजावर ताण येत आहे. परिणामी, विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाइन यंत्रणाही सातत्याने कोलमडत असल्याने नागरिकांना चांगली सेवा मिळत नाही. यामुळे आरटीओतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. याविरोधात येत्या काही दिवसांत राज्यातील काही मालवाहतूकदार संघटनांना सोबत घेऊन परिवहन आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

….तर कोर्टात जा

परिवहन मंत्री दिवाकर रावते एका कार्यक्रमानिमित्त शहरात नुकतेच आले होते. यावेळी आरटीओतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वसामान्यांना फटका बसत असून कार्यालयात कर्मचारी भरती करावी, अशा मागणीचे निवदेन देण्यात आले. मात्र, “याबाबत कोर्टामध्ये विषय प्रलंबित असून तुम्ही कोर्टात जा’ असा सल्ला निवेदन देणाऱ्यांना रावते यांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)