प्रत्यक्ष कर संकलनात 14 टक्‍के वाढ

नवी दिल्ली – डिसेंबर 2018 पर्यंत 8.74 लाख कोटी रुपये ढोबळ प्रत्यक्ष कर संकलन झाले असून गेल्या वर्षीच्या याच काळाशी तुलना करता यात 14.1 टक्के वाढ झाली आहे.

एप्रिल 2018 ते डिसेंबर 2018 या काळात 1.30 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला. आधीच्या वर्षातल्या याच काळाच्या तुलनेत यात 17 टक्के वाढ झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एप्रिल ते डिसेंबर 2018 या काळात परतावा समायोजनानंतर एकूण संकलनात 13.6 टक्के वाढ झाली असून तो 7.43 लाख कोटी झाला आहे. 3.64 लाख कोटी रुपये अग्रीम कर संकलन झाले असून गेल्या वर्षी याच काळाशी तुलना करता यात 14.5 टक्के वाढ झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)