भाजप नेत्यावर आयकर छापे

डेहराडून: उत्तराखंड मधील भाजप नेते अनिल गोयल यांच्या तेरा ठिकाणांवर आज आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले. उत्तराखंड आणि हरियाना या दोन राज्यांमधील त्यांच्या कार्यालयांवर हे छापे घालण्यात आले. त्यांच्या मालकीच्या क्वालिटी हार्डवेअर, उमंग साडीज, ऍलेक्‍सिाया पॅनेल्स, क्वांटम युनिव्हर्सिटी अशा संस्थांवर हे छापे घालण्यात आले. या संस्था त्यांच्या व त्यांच्या कुटुबियांच्या मालकीच्या आहेत.

गोयल यांनी सन 2016 साली भाजपच्या तिकीटीवर राज्यसभेची निवडणूक लढवली होती. तथापी त्यांचा आता भाजपशी काही संबंध नाही आणि त्यांच्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही अशी माहिती उत्तराखंड भाजपचे मिडीया प्रमुख देवेंद्र भसीन यांनी दिली. त्यांच्या मालमत्तांवरील छाप्यांमध्ये नेमकी किती रक्कम उघड झाली याची माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)