मायावतींच्या भावाच्या घरावर आयकर विभागाची कारवाई

400 कोटींचा अनधिकृत भुखंड केला जप्त

पाटणा : बसपच्या प्रमुख मायावती यांच्या भावाच्या घरी आयकर विभागाने कारवाई करत अनधिकृत संपत्ती जप्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मायावती यांचे भाऊ आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्रलता यांच्यावर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. विभागाने तब्बल 400 कोटी किंमत असणाऱ्या जमिनीला जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेला भुखंड नोएडामध्ये आहे.
आयकर विभागाने संबंधित विभागाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई केली आहे. दरम्यान, आयकर विभागाकडून येत्या काही दिवसात आनंद कुमार यांच्या आणखी काही अनधिकृत संपत्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)