दिल्लीत आयकर विभागाचे छापे

300 लॉकर्समधून 25 कोटींचे घबाड जप्त

नवी दिल्ली: दिल्लीतील खारी बावली येथील राजहंस सोप मिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर आयकर विभागाने छापा टाकला. या छाप्यात सुमारे 300 लॉकर्सची तपासणी करत 25 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एकूण आठ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.

-Ads-

प्राथमिक तपासात हवाला व्यवसायिक आपले पैसे लपवून ठेवण्यासाठी या खासगी लॉकर्सचा उपयोग करत होते अशी माहिती आयकर विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. याबाबत 5 नोव्हेंबर रोजी आयकर विभागाला माहिती मिळाली होती. त्यानंतर आयकर विभागाकडून पाळत ठेवण्यात आली होती. है पैसे राजधानीमधील काही हाय प्रोफाईल लोकांचे असल्याचे कळत आहे. यामध्ये तंबाखू व्यवसायिक, केमिकल व्यवसायिक आणि ड्राय फ्रूट डिलर्सचा समावेश आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवसायिकांचा हवाला ट्रेडिंगमधअये सहभाग असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे संबंध आहेत. तपास यंत्रणांनी केलेली या वर्षातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. सप्टेंबर महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) 700 कोटींच्या दुबईशी संबधित हवाला रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत 29 लाखांची रोख रक्कम आणि काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली होती.

ही कारवाई दुबई स्थित हवाला ऑपरेटर पंकज कपूर याचे व्यवसाय आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्याचे सुत्रांकडून समजले होते. तपास यंत्रणा त्याची चौकशी करत आहे. जानेवारी महिन्यात आयकर विभागाने खासगी लॉकरमधून 40 कोटींची रक्कम जप्त केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)