आबुधाबीमध्ये न्यायालयीन कामाकाजात हिंदीचा समावेश

दुबई : आबुधाबीमध्ये न्यायालयीन कामाकाजात हिंदीला तिसऱ्या क्रमांकाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अरेबिक आणि इंग्रजी या दोन भाषांच्या बरोबरीने हिंदी ही न्यायालयीन कामकाजाची अधिकृत भाषा असणार आहे. न्यायालयाच्या कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी आबुधाबीच्या विधी विभागाने शनिवारी हा निर्णय घेतला आहे.

प्रामुख्याने कामगारविषयक खटल्यांसाठी अरेबिक आणि इंग्रजी व्यतिरिक्‍त हिंदीलाही मान्यता देण्यात आली आहे. आबुधाबीमध्ये भारतातून अनेक कामगार कंत्राटी पद्धतीने काम करण्यासाठी येत असतात. त्यांच्याबाबतच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना भाषेचा अडथळा येत असतो.

कामगारांच्या करारांमध्ये पारदर्शकता आणि सोपेपणा असावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे दुबईस्थित एका वर्तमानपत्राने म्हटले आहे.

दुबईचे उपपंतप्रधान आणि अध्यक्षीय कामकाज मंत्री मन्सूर बिन झ्यायेद अल नह्यान यांच्या सूचनेनुसार काही भाषांचा अधिकृत भाषांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)