दिल्लीला राज्याचा दर्जासाठी 1 मार्चपासून बेमुदत उपोषण

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सूतोवाच

नवी दिल्ली – दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बेमुदत उपोषण पुकारण्याचे सुतोवाच केले आहे. येत्या 1 मार्चपासून आपले बेमुदत उपोषण सुरु होणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

दिल्ली सरकारला अपुरे अधिकार असल्यामुळे नागरिकांसाठीच्या कर्तव्यांची पूर्णपणे अंमलबजावणी करता येत नाहीत. दिल्लीच्या लोकप्रतिनिधींना कामासाठीचे अधिकार नाहीत. त्यामुळे दिल्लीच्या नागरिकांना स्वातंत्र्यापासूनच अन्याय आणि अवमान सहन करावा लागतो आहे. दिल्लीचे निवडून आलेले सरकार नागरिकांना न्याय आणि विकास देऊ शकत नाही. केंद्र सरकार कारभारामध्ये अडथळे आणत आहे. दिल्लीच्या मतदारांचे महत्व अन्य राज्यांपेक्षा कमी आहे का ? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आणि दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आपण बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)