वैष्णो देवी रोपवे चे उद्घाटन-3 तासांचा प्रवास 3 मिनिटात

कतरा (जम्मू-काश्‍मीर): वैष्णो देवी रोपवे चे उद्घाटन सोमवारी करण्यात आले आहे. जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी या रोपवेचे उद्घाटन राजभवनमधून केले. या रोपवे मुळे 3 तासांचा प्रवास 3 मिनिटात होणार आहे.
रविवारी दुपारनंतर विधिवत पूजा-अर्चा करून या रोपवेची चाचणी घेण्यात आली होती. चाचणी दरम्यान 3,000 पेक्षाही अधिक भाविकांनी या सुविधेचा मोफत लाभ घेतला. मात्र सेवा सुरू झाल्यानंतर या प्रवासासाठी भाविकांना 100 रुपये द्यावे लागणार आहेत. रोपवेसाठी सुमारे 75 कोटी रुपये खर्च आला असून तो पूर्ण होण्यास 4 वर्षे लागली.

वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर भैरोदेवाचे दर्शन घेतले जाते. त्याशिवाय वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण होत नाही. परंतु वैष्णोदेवी मंदिरात जाईपर्यंत भाविक थकलेले असतात आणि पुढील साडेतीन किमीचा चढण असलेला अवघड मार्ग चालून जाणे कठीण होऊन बसते. रोपवेमुळे आता ते सहज शक्‍य होणार आहे. दररोज सुमारे 4,000 भाविक वैष्णोदेवी मंदिरापासून भैरोदेवाच्या मंदिरापर्यंत रोपवेने जाऊ शकणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)