पुणे अर्बन बॅंकेच्या दहा शाखांचे एकाच दिवशी उद्‌घाटन 

पुणे – पुणे अर्बन बॅंकेच्या शिवाजीनगर, लक्ष्मी रोड, नाना पेठ, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, केसनंद फाटा, आंबेगाव, धनकवडी, नऱ्हे, खेड शिवापूर या दहा शाखांचे उद्‌घाटन रविवार, दि. 21.10.18 रोजी बारामती हायटेक टेक्‍स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी बॅंकेचे कार्याध्यक्ष नीलेश ढमढेरे, उपकार्याध्यक्ष बाबासाहेब वीर, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी बॅंकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार यांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्यामुळे एकाच दिवशी 20 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. पुणे शहरात विशेषकरून उपनगरांमध्ये 10 शाखा सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांकडून जास्तीत जास्त बचत ठेवी, चालू ठेवी, कायम ठेवी जमा व्हाव्यात व त्यामुळे कर्जदारांना माफक व्याजदरात कर्ज मिलावे असा आहे व त्यासाठी उद्‌घाटनाच्या दिवशीच मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही सर्व संचालक समाधानी आहोत. असे कार्याध्यक्ष नीलेश ढमढेरे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बॅंकेचा भांडवल पर्याप्तता रेशो 22.31 टक्के आहे. बॅंकेच्या 21 शाखा यशस्वीपणे कार्यरत असून दरवर्षी सभासदांना 15% लाभांश दिला जातो. सतत 12 वर्षे शून्य टक्के एनपीए असणाऱ्या या बॅंकेने ग्राहकांसाठी आरटीजीएस, नेफ्ट, एसएमएस या अत्याधुनिक सेवा उपलब्ध केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)