उत्तरप्रदेशात बेकायदा शस्त्रास्त्र निर्मीती कारखाना उघडकीस

File Photo

मुज्जफरनगर: उत्तरप्रदेतील चटेला गावात सुरू असलेला बेकायदेशीर शस्त्र निर्मीतीचा कारखाना पोलिसांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणी सध्या एकाला अटक केली असून अन्य संबंधीतांचा शोध जारी आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी तेथे छापा घालून हा कारखाना उघडकीला आणला. तेथे एक तयार पिस्तुल आणि सात पिस्तुल बॅरल्स जप्त करण्यात आली आहेत.

हा छापा घातला गेला त्यावेळी तेथे दोन जण काम करीत होते पण त्यातील एक जण पळून गेला. एका इसमाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव नासीर असे आहे. या कारखान्यात किती दिवसांपासून शस्त्रास्त्र निर्मीती सुरू होती व ती शस्त्रे कोठे विकण्यात आली याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्या राज्यात अशाच प्रकारचे उद्योग अन्यत्रही सुरू आहेत काय याची माहिती घेतली जात आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)