उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत 17 जणांचा मृत्यू

मृतांची संख्या पोहचली 180 वर

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशामध्ये नैऋत्य मान्सूनच्या सक्रियतेमुळे मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसामुळे घडलेल्या अपघातामुळे गेल्या 24 तासांत आणखी 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जण जखमी आहेत.

-Ads-

हवामान विभागाने सांगितले आहे की,  पूर्व उत्तर प्रदेशात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. पश्चिम भागातील उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला आहे. हवामान विभागाचे संचालक जे.पी. गुप्ता यांनी सांगितले आहे की, आणखी एका आठवडा पाऊस थांबण्याची शक्यता नाही आहे.

आपत्ती व्यवस्थापन आयुक्ताच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार लखनऊ मध्ये 4, गोण्डा, बांदा आणि कानपूर मध्ये प्रत्येकी 2 आणि आंबेडकर नगर, शारजहांपूर, पीलभीत, मिर्जापूर, इलाहाबाद, अमेठी आणि आजमगढ मे प्रत्येकी 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे जुलैपासून मृतांची आकडेवारी 180 झाली आहे. अधिक मृत्यू भिंत खचून किंवा घर पडल्याने, झाड पडल्याने आणि वीज पडल्याच्या कारणाने झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)