‘या’ परिस्थितीत कोणत्याही संघाला गुंडाळले असते – जेम्स अँडरसन 

लंडन: दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी केवळ 35.2 षटकांच्या खेळात इंग्लंडने बलाढ्य भारतीय फलंदाजीला केवळ 107 धावांतच गुंडाळले. पाच बळी घेणारा इंग्लंडचा अव्वल गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला की, दुसऱ्या दिवशीचे वातावरण पूर्णपणे आमच्या गोलंदाजांसाठी पोषक होते. तसे हवामान व तशा खेळपट्टीवरआम्ही जगातील कोणत्याही संघाला पहिल्याच दिवशी गुंडाळले असते.
अँडरसनने भेदक गोलंदाजी करताना केवळ 20 धावांमध्ये 5 फलंदाजांना बाद करत भारतीय संघाचे कंबरडे मोडले. त्याचबरोबर त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 27व्यांदा डावात 5 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला असून लॉर्डसच्या मैदानावर 99 बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. अँडरसन म्हणाला की, आमच्या गोलंदाजांनी मिळालेल्या संधीचे सोने करताना भारतीय संघाला रोखण्यात यश मिळवले. अशा आव्हानात्मक परिस्थितीत फलंदाजी करावी लागल्याने भारतीय फलंदाज कमनशिबी ठरले.
अँडरसनने सांगितले की, मैदानावरील शुक्रवारची परिस्थिती कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी आदर्श होती आणि आम्ही त्याचा पुरेपूर फायदा उचलताना एकही खराब चेंडू टाकला नाही. या परिस्थितीत आमच्या दडपणाखाली भारतीय फलंदाजी पत्त्याप्रमाणे कोसळली. या परिस्थितीत जगातील कोणत्याही संघाचे फलंदाज असेच बाद झाले असते. कारण आम्ही गोलंदाजीच त्या पद्धतीने केली होती.
खरे सांगायचे झाल्यास एखाद्या फलंदाजाने प्रतिकार केला असता तर मला खूप वाईट वाटले असते. कारण वातावरण आणि परिस्थिती पूर्णपणे आमच्या गोलंदाजांना साथ देणारी होती. त्यात जर कोणी धावा केल्या असत्या, तर आमच्या गोलंदाजीच्या मर्यादा दिसल्या असत्या. मात्र आमच्या गोलंदाजीसमोर कोणत्याही फलंदाजाला जास्त काळ टिकाव धरता आला नाही, असे सांगून अँडरसन म्हणाला की, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आमच्या पथ्यावर पडला. त्यातच ख्रिस वोक्‍ससारखा वेगवान गोलंदाज खेळवल्याचा आम्हाला फायदा झाला. पहिल्या दिवशी झालेल्या पावसाने आम्हाला गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)