अमेरिकेत नेवार्क विमान तळानजिक ड्रोन मुळे विमान वाहतूक विस्कळीत

न्युयॉर्क: अमेरिकेत नेवार्क विमान तळानजिक एका ड्रोन मुळे त्या परिसरातील विमान वाहतूक विस्कळीत झाल्याचे आढळून आले. या ड्रोन मुळे या विमानतळाच्या परिसरातील वाहतूक पुर्ण थांबवण्याची सूचना देण्यात आली होती पण ड्रोन गायब झाल्यानंतर आणि दुसरे ड्रोन त्या परिसरात आढळून न आल्यानंतर ही वाहतूक पुर्ववत सुरू करण्यात आली.

अमेरिकेत सध्या ड्रोनचा वापर वाढल्यामुळे अनेक वेळा विमान वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विमानतळाच्या 8 किमी परिसरात आणि चारशे फुटांच्यावरून ड्रोन उडवू नयेत अशी सूचना जारी करण्यात आली आहे पण अनेक वेळा या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने विमान वाहतुक नियंत्रणाची डोकेदुखी वाढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेवार्क विमान तळाच्या दिशेने येणाऱ्या वैमानिकांनीच वाहतूक नियंत्रण कक्षाला या आकाशात ड्रोन घोंगावत असल्याची माहिती दिली त्यानंतर विमान वाहतूक नियंत्रित करण्यात आली. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)