तामीळनाडूत सब-इन्स्पेक्‍टरपेक्षा खालच्या पदावरील पोलीसकर्मीना मोबाईल बंदी 

चेन्नई (तामीळनाडू): तामीळनाडूत सब-इन्स्पेक्‍टरपेक्षा खालच्या पदावरील पोलीसकर्मीना ड्यूटीवर असताना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस महासंचालक टी के राजेंद्रन यांनी या संबंधात परिपत्रक जारी केले आहे. ड्यूटीवर असताना पोलीस मोबाईलचा उपयोग सोशल मीडिया पाहण्यासाठी करत असल्याने त्यांचे ड्युटीवरील लक्ष विचलित होते. आणि याच कारणासाठी ड्यूटी करत असताना मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था, व्हीव्हीआयपी सुरक्षा, मंदिर आणि सणांवारांची सुरक्षा, अशा ड्यूटीवरील पोलीसांच्या मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)