राज्यात एकत्रित निवडणूकीची चाचपणी सुरू 

सल्ला घेण्यासाठी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती

मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या बरोबर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी घेता येतील का? याबाबत सल्ला देण्यासाठी राज्य सरकारने वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून एकत्रित निवडणुकांची चाचपणी सुरू केली आहे. समितीला अभ्यास करून अहवाल देता यावा म्हणून समितीच्या मदतीला कंत्राटी तत्त्वावर निवृत्त अधिकारी-कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी ‘एक देश-एक निवडणुका’ असा नारा दिला होता. देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व्हाव्यात असा भाजपचा आग्रह आहे.

यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी भारत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली होती. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही एकत्रित निवडणुका घेण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव डी. के. शंकरन्‌ हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

लोकसभा-विधानसभेसह महापालिका, जिल्हापरिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रमपंचायत यांच्या निवडणुका एकत्र घेणे राजकीय तसेच प्रशासकीयदृष्ट्‌या अव्यवहार्य असल्याचे बोलले जाते. यापार्श्वभूमीवर समिती सरकारला नेमका काय सल्ला देणार? याविषयी उत्सुकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)