प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात “पाटील’ ची घोडदौड

कथानक दमदार असेल आणि त्याची मांडणी उत्कृष्टरीत्या केली असेल तर प्रेक्षक त्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतात. कथानकातले वेगळेपण त्याची आशयघनता आणि योग्यरितीने केलेली मांडणीमुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “पाटील’ या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, या शहरात प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादात चित्रपटाची घौडदौड सुरु आहे.

शिवाजी पाटील या व्यक्तीची संघर्षगाथा घेऊन “पाटील’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संकटांवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी कौतुकोद्गार काढले आहेत. संतोष राममीना मिजगर लिखित-दिग्दर्शित, “पाटील संघर्ष… प्रेम आणि अस्तित्वाचा’ चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्‍शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बॉलीवूड टुरिझम आणि “ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जयशील मिजगर, तेजल शहा, नीता लाड, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, सौरभ तांडेल, दीपक दलाल, अभिराम सुधीर पाटील सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. 4 जानेवारीपासून “पाटील’ चित्रपटराज्यातल्या इतर शहरांतूनही धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)