दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघात 179 उमेदवार निवडणूक रिंगणात

99 उमेदवारांनी अर्ज घेतली मागे

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत दहा मतदारसंघात अर्ज वैध ठरलेल्या 278 पैकी 99 उमेदवारांनी आपली अर्ज मागे घेतली असून, 179 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी अंती 278 उमेदवारांची अर्ज वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 278 पैकी 99 उमेदवारांनी माघार घेतली.
दरम्यान, बुलढाणा (12), अकोला (11), अमरावती (24), हिंगोली (28), नांदेड (14), परभणी (17), बीड (36), उस्मानाबाद (14), लातूर (10)0 आणि सोलापूर मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)