रथयात्रा प्रकरणात प. बंगालकडून मागवला प्रतिसाद

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित रथयात्रांना अनुमती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली असून त्यावर पश्‍चिम बंगाल सरकारने आपला प्रतिसाद द्यावा अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिली आहे. पश्‍चिम बंगाल सरकारने जातीय तणाव निर्माण होईल या कारणाने भाजपच्या रथयात्रांना अनुमती नाकारली होती. त्याला भाजपने कोलकाता हायकोर्टात आव्हान दिले होते पण हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावत पश्‍चिम बंगाल सरकारचा निर्णय कायम केला होता.

हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर तेथे सुनावणी सुरू असून त्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने पश्‍चिम बंगाल सरकारला त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जानेवारीला होणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)