श्रीकांत उपान्त्यपूर्व फेरीत, सायनाचे आव्हान संपुष्टात

मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा
कुआलालंपूर: भारताचा अव्वल पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांतने तैपेई चीनच्या वांग त्झु वेई याच्यावर संघर्षपूर्ण लढतीनंतर मात करताना येथे सुरू असलेल्या मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती अनुभवी महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे महिला एकेरीतील आव्हान दुसऱ्याच फेरीतील पराभवामुळे संपुष्टात आले.

गेल्या वर्षी चार सुपर सेरीज स्पर्धा जिंकून खळबळ उडविणाऱ्या श्रीकांतने दुसऱ्या फेरीच्या लढतीत तैपेई चीनच्या वांग त्झु वेई याचे आव्हान 22-20, 21-12 असे 36 मिनिटांच्या लढतीनंतर संपुष्टात आणले. श्रीकांतसमोर उपान्त्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या ब्राईस लीव्हरडेझचे आव्हान आहे. लीव्हरडेझने दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीचा प्रतिकार 21-18, 21-17 असा मोडून काढला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याआधी विश्‍वक्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या आकाने यामागुचीने सायनाची झुंज 21-15, 21-13 अशी मोडून काढत तिसऱ्या फेरीत धडक मारली. सायनाने पहिल्या फेरीत यिप पुई यिन हिच्यावर सरळ गेममध्ये मात केली होती. परंतु यामागुचीविरुद्ध तिला पुन्हा पराभव पत्करावा लागला. सायनाची द्वितीय मानांकित आकाने यामागुचीविरुद्ध सरळ सेटमध्ये पराभव पत्करण्याची ही सहावी वेळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)