पुणे जिल्हा परिषदेतील भरतीसाठी उमेदवारांची गडबड सुरू

पुणे – जिल्हा परिषदेअंतर्गत सरळसेवेची रिक्त पदे भरण्यात येणार असून, राज्य शासनाच्या ग्रामविभागाकडून 26 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये गट- क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) 584 पदे आणि अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 11 पदे असे एकूण 595 पदांची भरती करण्यात येणार असून, जिल्ह्यातील तरूणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तरूणांची धडपड सुरू आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी www.mahapariksha.gov.in या संकेतस्थाळावर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे

दरम्यान, भरती पक्रियेत अनुसूचित क्षेत्रातील (बिगर पेसा) आरोग्य सेविका – 272, सेवक (पुरूष) – 61 आरोग्य सेवक (पुरूष, हंगामी फवारणी कर्मचारी) – 112, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 15, कंत्राटी ग्रामसेवक – 15, औषध निर्माता – 16, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 3, विस्तार अधिकारी (कृषी) – 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 51, पशुधन पर्यवेक्षक – 4, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – 13, पर्यवेक्षिका (नामनिर्देशनाने) – 5, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) – 10, कनिष्ठ लेखाधिकारी 4 ही पदे भरण्यात येणार आहे. तर अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) : आरोग्य सेवक (पुरूष, हंगामी फवारणी कर्मचारी) 1 आणि आरोग्य सेविका 10. अनुसूचित क्षेत्रातील संवर्गनिहाय पदे ही शासन अधिसूनेनुसार जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी राखीव असून, स्थानिक उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)