चेन्नई – “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता” असं वक्तव्य केल्याने कमल हसन यांना सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेनं जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर गुरुवारी एका प्रचारसभेदरम्यान, कमल हसन यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले. तामिळनाडूमधील आरावकुरिची येथे ही घटना घडली. कमल हसन हे आपले भाषण आटोपून मंचावरून उतरत असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
Kamal Haasan on stones thrown at his rally in Trichy: I feel the quality of polity is going down. I don’t feel threatened. Every religion has their own terrorist, we cannot claim that we are sanctimonious. History shows that all religions have their extremists. #Chennai pic.twitter.com/R7buqXnUBU
— ANI (@ANI) May 17, 2019
दरम्यान, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेते कमल हसन सध्या राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाची स्थापना केली असून ते सध्या तामिळनाडूतील मध्यावधी निवडणुकांसाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले की, ”आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे असे मला वाटते. मात्र असा प्रकारांमुळे मी घाबरलेलो नाही. प्रत्येक धर्मात त्यांचे स्वत:चे दहशतवादी आहेत. आम्ही खूप पवित्र आहोत असा दावा कुठलाही धर्म करू शकत नाही. प्रत्येक धर्मात अतिरेकी होते हे इतिहास सांगतो.”
Kamal Haasan on protest over his Godse remark: I am not afraid of being arrested. Let them arrest me. If they do that it will only create more problems. It is not a warning but only an advice. pic.twitter.com/hVMkP3I9mJ
— ANI (@ANI) May 17, 2019