नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात – गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

कणकवली – काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आज कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं आंदोलन केलं होतं. मात्र यावेळी काँग्रेस आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आता नितेश राणे यांनी कणकवली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून त्यांची उद्या कोर्टामध्ये पेशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकेबाबत गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला अधिकृत माहिती देताना सांगितले की, “नितेश राणे यांना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. गृह मंत्रालय या प्रकरणी चौकशी करेल.”

तत्पूर्वी, कणकवली पोलिसांनी सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 40-50 कार्यकर्त्यांवर आयपीसीच्या कलम 353, 342, 332, 324, 323, 120 (ए), 147, 143, 504, 506 अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here