मुंबई – 13व्या रमेश देसाई मेमोरियल 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरीत मुलींच्या गटात वैष्णवी अडकर व रेनी सिंगला यांना, तर मुलांच्या गटात निखिल निरंजन व डेनिम यादव यांनी विजेतेपद पटकावले.
दुहेरीच्या मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत कर्नाटकच्या निखिल निरंजनने मध्यप्रदेशच्या डेनिम यादवच्या साथीत चंदीगडच्या अजय सिंग व कृष्णा हुडा या जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. तर मुलींच्या गटात हरियाणाच्या रेनी सिंगलाने महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरच्या साथीत ऋतूजा चाफळकर व हृदया शहा यांचा 3-6, 6-3, 11-9 असा सुपरटायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.