नोकर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश

वसई: क्विकर डॉट कॉमवर जाहिरात देवून घरकाम करण्यासाठी पूर्णवेळ विश्वासू नोकर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विरारच्या स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीमधील दोन जणांना गजाआड केले आहे.

राज जयप्रकाश सक्‍सेना आणि अर्जुन सत्यनारायण नाईक अशी अटक आरोपींची नावे आहेत. राज हा विरार ग्लोबल सिटी, तर अर्जुन हा सांताक्रूझ येथे राहतो. या दोघांनी आयकॉन मेड सर्व्हिस आणि समर्थ इंटरप्राइजेस नावाच्या दोन कंपन्यांची 2 महिन्यांसाठी क्विकर डॉट कॉमवर नोंदणी केली होती. या नोंदणीच्या आधारे पूर्णवेळ घरकाम करण्यासाठी नोकर देत असल्याची जाहिरात टाकली होती. या जाहिरातीद्वारे हे दोघे लोकांची फसवणूक करत होते.

पुणे, नागपूर, कानपूर, हैदराबाद, बंगळुरु, दिल्ली, शिमला, वाराणसी यासह अन्य राज्यातील 150 पेक्षा जास्त लोकांची या टोळीने आर्थिक फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यापैकी 2 जणांना अटक केली असून, त्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)