शेतकऱ्यांच्या नावाखाली ‘पाटबंधारे’ विभागाकडून दिशाभूल

सजग नागरीक मंचचा आरोप : अकार्यक्षमता लपविण्यासाठी दावा

पुणे –
महापालिकेने शहरातील सांडपाणी शुद्ध करून बेबी कॅनॉलमध्ये सोडल्यानंतर शेतकरी घेण्यास उत्सूक नसल्याचा दावा पाटबंधारे विभाग करत आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तूस्थिती वेगळी असून आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून हा दावा केला जात असल्याचा आरोप सजग नागरीक मंचाने केला आहे.

मुंढवा जॅकवेलमधून सिंचनासाठी पुनर्वापर व्हावा म्हणून दररोज 550 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया करून देण्याचा प्रकल्प पुणे मनपाने नागरिकांच्या करांचे 100 कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी उभारला. मात्र, ज्या बेबी कॅनॉलमधून हे पाणी दौंडपर्यंत जाणे अपेक्षित आहे. त्याची दुरवस्था झाली असल्याने जल संपदा विभाग जवळपास निम्मेच पाणी शेतीसाठी उचलत असल्याची बाब सजग नागरीक मंचाकडून उघडकीस आणली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाकडून हे पाणी शेतीसाठी योग्य नसल्याचे, वापरण्यास शेतकरी उत्सूक नसल्याचे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यातच दौंड भागातील शेतकऱ्यांनी तसेच काही ग्रामपंचायतींनी मुंढवा जॅकवेलमधील पाणी शेतीसाठी आवश्‍यक व उपयुक्त असल्याची पत्रे पालिकेला पाठवली आहेत. तरीही हे पाणी शेतीसाठी वापरण्यास शेतकरी उत्सूक नाहीत, असे सांगत पाटबंधारे विभाग दिशाभूत करत असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि विश्‍वास सहस्त्रबुद्धे यांनी केला आहे. तसेच पाणी शेतकरी शेतीसाठी वापरण्यास उत्सूक नसतील तर गेल्या 2 वर्षांत मुंढवा जॅकवेलमधून जलसंपदा विभागाने 7 टिएमसी पाणी बेबी कॅनॉलमध्ये सोडले असल्याचे आकडे जाहीर केले असून ते शेतीसाठी वापरले गेले नसेल तर मग कोठे वापरले, असा सवाल सजग नागरीक मंचाने उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)